75 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन केले सन्मानित 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) ✳️💠✳️💠
2019- 20 या शैक्षणिक वर्षात उरण पूर्व विभागातील इ.10 वी आणि इ. 12 वी च्या परीक्षेत 80 आणि 80 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वाघेश्वर मंदिर पिरकोन येथे आयोजित केला होता.
कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अश्या निवृत्त मेजर संतोष (बंटी) ठाकूर आणि नेपाळ व मलेशिया कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरलेली कुस्तीपट्टू कु.अमेघा घरत, आणि संस्थेचे अध्यक्ष चेतन गावंड यांच्या हस्ते 75 विद्यार्थाना सन्मानचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
मेजर संतोष ठाकूर यांनी आपल्या छोट्याश्या मनोगतात, संस्थेच्या या उपक्रमाची प्रशंसा करून या संस्थेने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी दिलेल्या ह्या अमूल्य अश्या शुभेच्छा आहेत अश्या शब्दात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल वर्तक व राजेंद्र ठाकूर यांनी केले, तर प्रास्ताविक अमित म्हात्रे यांनी आणि उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी जागेची परवानगी देणाऱ्या वाघेश्वर मंदिर कमिटीचे आभार प्रशांत म्हात्रे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, वरील पदाधिकाऱ्यां बरोबर शेखर म्हात्रे, प्रांजळ पाटील, विद्याधर गावंड कौशिक ठाकूर आणि सचिन वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली.






Be First to Comment