सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔶🔷
स्वच्छता अभियान राबविण्यात महत्वाचा घटक असणाऱ्या आणि यात प्रामुख्याने अत्यंत चिकाटीने दिवसरात्र मेहनत घेऊन सन २०२० च्या स्वच्छता सर्व्हेक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार नगरपरिषदेच्या आवारात विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, आरोग्य अभियंता अभिमन्यू येळवंडे, अन्सार महापुळे,मुकादम चंद्रकांत शेटे,कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे,आणि अन्य कार्यालयीन अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्वच्छता अभियान राबविण्यात त्याचप्रमाणे अन्य अभियानात सुध्दा आजवर अनेक पुरस्कार माथेरान नगरपरिषदेने प्राप्त केले आहेत.
रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान या दुर्गम भागातील ‘क’वर्ग दर्जा असलेल्या नगरपरिषदेने यावेळेस सन २०२० मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात संपूर्ण पश्चिम विभागातील एकूण पाच राज्यांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला असून महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.त्यातच
सन २०२० च्या स्वच्छता सर्व्हेक्षणात दहा कोटी रुपयांची मानकरी माथेरान नगरपरिषद ठरली आहे.
यासाठी सफाई कामगार यांनी संपूर्ण गावातील ओला सुका कचरा संकलित करून गाव स्वच्छ करत आहेत. घाणीची कामे गटारात उतरुन संपूर्ण गटारे नियमितपणे साफसफाई करत असतात. त्यातच इथे कचरा वाहून नेण्यासाठी मोटार वाहन ( घंटागाडी )नसताना स्वतः हातगाडीच्या साहाय्याने डंपिंग ग्राउंड वर जमा केला जात आहे. कचरा वेचक महिला घरोघरी जाऊन ओला सुका कचरा गोळा करीत आहेत.
यामध्ये कायम कामगार ३३ आणि ठेका पध्दतीने कामे करणारे एकूण साठ कामगार हे सर्व आरोग्य अभियंता अभिमन्यू येळवंडे, अन्सार महापुळे,मुकादम चंद्रकांत शेटे,कैलास सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.पहाटे सहा वाजता काही कामगार मुख्य रस्त्याची साफसफाई करत असतात. आज जो पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तो केवळ याच सफाई कामगारांच्या मेहनतीने आणि चिकाटीने प्राप्त झाला आहे असे मत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी स्पष्ट केले.
खरे स्वच्छता दूत आणि स्वच्छतेचे मूळ हा सफाई कामगार आहे.माथेरान आजही प्लास्टिक मुक्त असून सफाई कामगार इमानेइतबारे आपले काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी नक्कीच नगरपरिषदेच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच त्यांची निवासस्थाने आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले जातील.१० कोटी रुपयांचे जाहीर झालेल्या पारितोषिकाचे खरे मानकरी सफाई कामगार आहेत. त्यांचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे.






Be First to Comment