सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ९ जण सापडले आहेत. तर आज कोणा रुग्णाला घरी सोडण्यात आले नाही तसेच कोणीही मयत नाही. ही श्री गजाननाची कृपा असल्याचे बोलले जाते.
आज एकूण पॉझिटीव्ह १२२०, उपचार करून बरे झालेले ९८०, उपचार घेणारे १८३, मयत ५७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज चिरले १, आवरे १, भेंडखळ २, वैभव लक्ष्मी अपार्टमेंट १, केगाव १, करळ १, बौद्धवाडा उरण १, सीआयएसएफ जेएनपीटी १ असे एकूण ९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर आज उपचार करून कोणालाही घरी सोडण्यात आले नाही तसेच कोणीही मयत झालेले नाही.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला उरणमध्ये अवघे ९ पॉझिटीव्ह आढळले तर कोणीही मयत झाले नाही ही एक जमेची बाजू मानली जाते. यामुळे उरणमधील कोरोना गणरायाच्या कृपेने जाऊन उरण कोरोनामुक्त होईल अशी भावना गणेशभक्तांची झाली आहे.






Be First to Comment