वनधन विकास केंद्रातर्फे आदिवासी बांधवांना मार्गदर्शन 🔶🔷🔶🔷
आयुर्वेदीक वनौषधी वनस्पती माहिती तंत्रातून रोजगाराच्या संधीचे निर्माण : तहसीलदार दिलीप रायन्नावार 💠✳️💠✳️
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) #
आयुर्वेदीक वनौषधी वनस्पती माहिती तंत्रातून रोजगाराच्या संधीचे निर्माण होत असल्याचे प्रतिपादन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले. सुधागड तालुक्यातील आदिवासी समाज हॉल पाली येथे वनधन विकास केंद्र शहापूर यांच्या माध्यमातून आयुर्वेदिक व औषधी वनस्पतीबाबत माहिती अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी तहसीलदार बोलत होते. कार्यक्रमात वनौषधी व सुगंधी वनस्पती बाबत उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. रोगनिवारण, वेदनाशमन आदी वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती जंगलभागात उपलब्द आहेत. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून ( उदा., पाने, मुळे, खोड इ. ) तयार केलेले काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
आज कोरोनासारख्या साथीच्या रोगात अशाच प्रकारच्या वनौषधाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. सुधागड तालुका हा घनदाट अरण्याने वेढला आहे. जंगलातील विविध वैशिष्ट्य पूर्ण गुणकारी औषधी वनस्पती आणून त्यांची विक्री केल्यास रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, शिवाय घरच्या घरी काम मिळून स्थलांतर होण्याचे प्रमाण कमी होईल अशी माहिती वनधन विकास केंद्राच्या प्रियंका मॅडम व अन्य पदाधिकारी यांनी दिली.
यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी बांधवांचे वास्तव हे रानावनात, जंगल भागात आहे. अशातच येथील वनौषधी वनस्पतीचे प्रकार, वैशिष्ट्ये , उपयोग याचे पुरेपूर ज्ञान अवगत करावे. या माहिती तंत्रातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आदिवासी बांधवांनी आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व जाणून उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पहावे, याकामी प्रशासनस्थरावर आवश्यक ते सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही तहसीलदार रायन्नावार यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, सुधागड तालुका समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, विश्वास भोय, कृष्णा वाघमारे, भगवान नायक (जिल्हा अध्यक्ष),अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार, दत्ता वाघमारे, विकास कोळी, अंकुश वाघमारे, राजेश कोपरे, रवी जाधव, सुरेश नायक, गुलाबताई वाघमारे, भारती जाधव, चंद्रकान पवार, मुकेश नायक दत्ता नायक, बबन वाघमारे, सतीश हीलम, सविता काफरे, रोहिदास हीलम आदींसह आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.






Be First to Comment