आदिवासी बांधवानी ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्यामुळे गैरकारभार आला समोर 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
लोधिवली ग्रामपंचायतीला आदिवासी बांधवानी टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायतीचा गैरकारभार समोर आला असून पंधरा टक्के निधी का खर्च झाला नाही याचा खुलासाचे देण्याचे आदेश वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर यानी ग्रामसेवकाला दिले आहेत.
मागील दोन वर्ष आणि या वर्षीचा पंधरा टक्के निधीचा वापर आदिवासी समाजासाठी न झाल्याने संतप्त आदिवासीनी लोधिवली ग्रामपंचायतीला दोन दिवसापूर्वी टाळे ठोकले होते..जवळपास चाळिस लाख निधी आदिवासीसाठी असताना तो इतरञ खर्च करण्यात आला आहे.मागील दोन वर्ष आणि चालू वर्षाचा पंधरा टक्के निधी आदिवासीसाठी राखीव असताना वापरण्यात आला नाही. पुढल्या वर्षी खर्च करू असे आश्वासनावर बोळवण होत असल्याने अखेरीस संतप्त आदिवासींनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. पंचायत समिती उपसभापती श्याम साळवी यांनी समजूत काढल्यावर टाळे उघङण्यात आले होते.
खालापूर पंचायत समिती वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये आणि विस्तार अधिकारी शिंदे यानी दुस-या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली होती.ग्रामसेवकाला याबाबतीत चांगलेच फैलावर घेतले होते.
पंधरा टक्के निधी का खर्च करण्यात आला नाहि याबाबत लेखी खुलासा मागितला आहे.इतर सर्व खर्च थांबवून प्रथम पंधरा टक्के निधी आदिवासीना देण्याचे आदेश दिले आहेत
संजय भोये
-वरिष्ठ गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती






Be First to Comment