सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे) 🔷🔶🔶🔷
माथेरानकरिता एकमेव शासनमान्य सार्वजनिक वाहनसेवा असलेली एसटी ची मिनीबस सेवा बंद असल्याने माथेरानकरांचे हाल होत असून गणपती सण आल्याने ही सेवा लवकर सुरु करावी अशी मागणी माथेरानमधून होत आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी सेवा बंद केल्यानंतर माथेरानची मिनीबस सेवा सुध्दा बंद करण्यात आली होती पण सध्या राज्यात व परराज्यात ही एसटी सेवा सुरु होत असताना माथेरानकरिता प्रवासाचे एकमेव शासकीय स्रोत असलेली एसटी सेवा सुरु होत नसल्याने माथेरानकरांचे मात्र हाल होत आहेत. नेरळ माथेरान घाट रस्त्यावर चालणाऱ्या प्रवासी टॅक्सी सेवा ही सध्या बंद आहे. जर कोणास नेरळ येथे जायचे असल्यास पूर्ण गाडीच्या भाड्यासाठी खूपच रक्कम खर्च करावी लागत आहे. सर्वत्र एसटी सेवा सुरू करण्यात आलेली असताना कर्जत आगार काय नेहमीप्रमाणे माथेरान करांच्या निवेदनाचीच वाट पहात आहेत की काय ? या आगाराचे प्रमुख याबाबतीत काहीच गांभीर्याने लक्ष केंद्रित करीत नाही असाही प्रश्न निर्माण होत आहे.
माथेरान मध्ये लॉक डाऊन मुळे कामधंदे बंद झाल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या माथेरानकरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून गणपती पूर्वी एसटी सेवा सुरु करावी अशी मागणी माथेरानकर करीत आहेत.






Be First to Comment