सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे ) 🔶✳️💠🔷
माथेरान नगरपालिका चाळ व रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या सार्वजनिक शौचालयाला गळती लागल्याची बातमी नुकतीच मीडिया मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी घेतली असून लवकरच हे शौचालय दुरुस्तीचे काम सुरु करणार असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष येथे भेट घेऊन सांगितले .

निसर्ग चक्रीवादळामध्ये प्रभाग क्र.सहा येथील सार्वजनिक शौचालयाचे छप्पर उडून गेल्यानंतर त्याची दुरावस्था झाली होती. प्रामुख्याने महिला शौचालयाला धबधब्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे महिलावर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. आधीच जीर्ण झालेली हि वास्तू व येथील संडासांची झालेली दुरावस्था अधिकच बिकट झाली होती. त्यातच गळती लागल्याने सर्वत्र बुरशी व कुबट वासाने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे येथील महिलांची हे शौचालय त्वरित दुरुस्त करा अशी सारखी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे होत होती. पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांनी लेखी निवेदन देऊन नगराध्यक्षाना ह्यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली होती.
त्याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्षा सौ.प्रेरणा सावंत यांनी ह्या शौचालयास भेट देऊन शौचालय दुरुस्तीसाठी पावले उचलली. लवकरच ह्या ठिकाणी नवीन पत्रे,शौचालयांची आवश्यक ती सर्व कामे तातडीने सुरु करण्यास संबंधित खात्याला आदेश दिले आहेत. लवकरच ही कामे सुरु होणार असल्याने महिलावर्गात समाधानाचे वातावरण आहे. ह्यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,प्रभागाचे नगरसेवक संदीप कदम व इतर अधिकारी उपस्थित होते .






Be First to Comment