Press "Enter" to skip to content

कराडे खुर्दं ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी यशश्री मुरकुटे बिनविरोध

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔶🔷

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीत असलेल्या कराडे खुर्दं ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा मुकेश परशुराम पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवड ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.यावेळी उपसरपंचपदासाठी यशश्री योगेश मुरकुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदिप धारणे यांनी काम पाहिले तर सरपंच भारती चितले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी यशश्री मुरकुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे,माजी सरपंच विजय मुरकुटे,शैलेश म्हात्रे,भाजपा तालुका उपाध्यक्ष अॅड.संजय टेंबे,केलवणे विभागीय अध्यक्ष माजी सरपंच किरण माली,माजी उपसरपंच रविंद्र चितले,माजी उपसरपंच भानूदास माली,माजी उपसरपंच प्रकाश माली, ग्रामपंचायत सदस्या मिनल ठोंबरे, नलिनी कारंदे, प्रमिला पाटील,केलवणे भाजपा जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर, जनार्दन महाडिक,शिक्षक मंदार वेदक,राजेश सोनावणे,बंडू मोडक,बाला क्रिडावकर,बाला चोरघे,विनायक गायकवाड, अमित पाटील, राजेश कारंदे, विशाल मुरकुटे, मयुर मुरकुटे,संदिप पाटील, धनाजी ठोंबरे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोनाचे भान ठेवून सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.कराडे खुर्दं ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी यशश्री मुरकुटे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.