आगरी ऑल इन वन संस्था” व कोलशेत गाव उत्कर्ष सामाजिक संस्थेचा उपक्रम
🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर )
🔶🔷🔷🔶
रंगमंच कामगारांनी २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी “आगरी ऑल इन वन संस्था” आणि कोलशेत गाव उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य वाटप करण्यात आले.
एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू आहे आणि एकीकडे जगावर कोरोनाचे सावट आहे. आनंदासाठी आपण सण उत्सव संस्कृती साजरे करतो. उद्योग धंदे बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक टंचाई जाणवते, त्यामुळे सण-उत्सव पूर्वीसारखे जल्लोषात साजरे करता येणार नाही . अशा परिस्थितीमध्ये रंगमंच कामगारांचे काम चार महिन्यांपासून संपुर्ण बंद आहेत. त्यांनीही गणेश उत्सवात घरात आनंद साजरा करावा यासाठी आगरी ” ऑल इन वन संस्था”, ठाणे यांच्या सोबत “कोलशेत गाव उत्कर्ष सामाजिक संस्था” यांनी पुढाकार घेऊन रंगमंच कामगारांना जीवनावश्यक वस्तू व अन्न-धान्य वाटप केले.
आगरी ऑल इन वन संस्था, गेली साडेचार महिने रंगमंच कामगार आणि नाटकार, पत्रकार, सिनेमा, सिरीयल मध्ये काम करणाऱ्या गरजवंताना मदतीचा हात देत आहे… आजपर्यंत आगरी ऑल इन वन संस्थेने ठाणे, वाशी, भिवंडी, मुलुंड, दादर पर्यंत ५५० कलाकारांना आणि रंगमंच कामगारांना जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य वाटप करण्यात आले.






Be First to Comment