गव्हाण जिल्हा परिषद सिडको प्रकल्प बाधीत क्षेत्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे आरक्षित भूखंड देण्याची मागणी 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / गव्हाण 🔷🔶🔶🔷
रायगड जिल्हा परिषद सदस्य रविंद्र विश्वनाथ पाटील यांनी काल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांची भेट घेऊन गव्हाण जिल्हा परिषद सिडको प्रकल्पबाधि क्षेत्रातिल रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा बामणडोंगरी,मोरावे, जावळे,न्हावे आणि बेलपाडा तसेच शेलघर येथील रा.जि.प.शाळेसाठी आरक्षीत असलेला सेक्टर 16 मधिल भुखंड क्र.20/21 हा शाळेसाठी त्वरित मिळावा अशी आग्रही मागणी केली.
त्याचप्रमाणे प्राथमिक अरोग्य केंद्र गव्हाण ची ईमारत मोडकळीस आली असुन रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग येथे नाही. हव्या असणार्या सुख सुविधा मिळत नाहीत. येथे उलवे नोड विकसीत झाल्यामुळे लाखोंच्या संखेने लोकसंख्या वाढल्यामुळे दररोज 350 ते 400 रुग्ण ह्या आरोग्य केंद्रात उपचार घेत असतात. त्यामुळे रुग्णांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागते. तसेच हि रुग्ण संख्या भविष्यात हजारोंच्या पलिकडे जाईल. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव ह्या विभागात व उलवे नोड मध्ये वाढत आहे. तरी सिडकोने सुसज्य व अद्ययावत आरोग्य केंद्र उभारणीसाठी भुखंड व निधी उपलब्ध करुण द्यावा.
तसेच सिडकोच्या माध्यमातुन उभारण्यात आलेले उलवे नोड व करंजाडे नोड मधिल उप आरोग्य केंद्र त्वरीत सिडकोने निधी खर्च करुन लागणार्या सर्व सुख सुविधा म्हणजेच आरोग्य अधिकारी , परिचारीका , औषधांचा साठा उपलब्ध करुन द्यावा. सिडकोच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या उलवे नोड व करंजाडे नोड मधिल स्मशानभूमी त्वरित सर्व सुविधा उपलब्ध करुन ग्रामस्थांच्या स्वाधीन कराव्यात असे मागणी पत्र मा.व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याकडे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी करावे अशी विनंती रा.जि.प.सदस्य रविंद्र वि. पाटील यांनी यावेळी केली.
यावर मुख्याधिकारी यांनी लवकरच गव्हाण जिल्हा परिषद विभागाचा दौरा करण्याचे आश्वासन दिले आहे.






Be First to Comment