सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔶🔷
जिल्ह्यातील जातीय सलोखा राखण्यासाठी तसेच साजरे होणारे सण,उत्सव आणि धार्मिक उत्सव यावेळी शांतता प्रस्थापित व्हावी.यासाठी सूचना आणि उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती काम करते.या समिती मध्ये जिल्ह्यातील २३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये रोहे तालुक्यातील सेवाभावी वृत्तीचे प्रतिष्ठित व नामवंत डॉ.फरीद चिमावकर यांची जिल्हा शांतता कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ.फरीद चिमावकर यांची जिल्हा शांतता कमिटी वर नियुक्ती करण्यात आली आहे.रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष सक्षम प्रतिनिधी , डॉक्टरी पेशाने असल्याने तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तळागाळातील लोकांशी आपुलकीचे, सामाजिक बांधिलकी चे नाते जपण्याच्या दृष्टीने सेवाभावी वृत्तीने “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” समजून प्रत्येक रुग्णांची वैयक्तिक काळजी घेताना दिसत असतात.त्यांनी रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष सक्षम प्रतिनिधी म्हणून देखील उल्लेखनीय कामगिरी करून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देणारे आदर्श डॉक्टर आहेत. तसेच त्यांचे विविध सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयक संस्थांशी जवळचे व आपुलकीचे संबंध असल्याने त्यांच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे,असे विविध प्रकारचे समाज हिताचे कार्य राबविले जात असतात.
डॉ.फरीद चिमावकर यांची रायगड जिल्हा शांतता कमिटी मध्ये निवड झाल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील उज्ज्वल भवितव्याच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या जात आहेत..






Be First to Comment