कोरोनामुळे अरब देशात जाणारा बाप्पा यंदा राहीला घरीचं 🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
तालुक्यातील चौक येथून अरब देशात जाणारा बाप्पा यंदा कोरोना महामारी मुळे भक्तांच्या भेटीला जाणार नसून कोरोना विघ्नामुळे यंदा बाप्पाची परदेश वारी रद्द झाली आहे.
कोकण,रायगङसह सर्वञ मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला आहे. खालापूर तालुक्यातील चौकनजीक असलेेेेल्या तुपगाव सारख्या छोट्या गावातून गणेश मूर्ती मस्कतला पाठविण्यात येते. पन्नास वर्षे गणेश मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय असलेल्या आपटेकर यांच्या श्री गणेश कला केंद्रातून मूर्ती मस्कतला जात असे. पनवेल येथील मुरके परिवार मस्कत येथील नातेवाईकांसाठी गणेशमूर्ती पाठवत असत.यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे सण उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

शासनाचे नियम व अटीमुळे देखील अनेक सार्वजनिक मंङळानी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.लाॅकङाऊनमुळे वाहतुक सेवा देखील मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली आहे.हवाई वाहतुक देखील बाधित झाल्याने देशाबाहेर पाठविण्यात येणा-या गणेश मूर्तीच्या संख्येवर परिणाम झाला आहे.







Be First to Comment