सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / रायगड 🔷🔶
महावितरण कंपनीतर्फे दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव महाराष्ट्र दिन व कामगार दिनी केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे, सदर कार्यक्रम ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी महावितरणच्या गोरेगांव विभागीय कार्यालयात ७४ व्या स्वातंत्र्य दिनी, कार्यकारी अभियंता श्री. आप्पासाहेब खांडेकर यांच्या हस्ते उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचार्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

गोरेगांव विभागातील वरीष्ठ तंत्रज्ञ सर्वश्री. केशव जांबरे, दिनकर शिंदे, स्वप्निल महाडिक, प्रधान तंत्रज्ञ सर्वश्री. सूर्यकांत चांदोरकर, साहेबराव पाटील व वरीष्ठ यंत्रचालक, श्री. संजय मोरे, या सर्वांचे उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच जून महिन्यामध्ये झालेल्या निसर्ग चक्रिवादळामुळे, गोरेगांव विभागातील वीज वितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले होते. मा. ऊर्जामंत्री, डॉ. श्री नितीन राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून बाधीत गावांना लवकरात लवकर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक अभियंता, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांच्या कामगारांसह इतर परिमंडळातून मनुष्यबळ व इतर साधन सामुग्रीची मदत गोरेगांव विभागास पाठविण्यात आली.
कोकणातील पाऊस, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम घेऊन काम करुन सर्व बाधित भागांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे म्हणून सन्मान पत्र देऊन त्यांनाही गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री. पांडुरंग बोके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, श्री. निशिकांत धाईंजे, उप व्यवस्थापक (वि व ले), श्री. अनिल वाकोडे, प्रभारी उप व्यवस्थापक (मासं) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






Be First to Comment