तातडीने खड्डे भरा जिल्हा सचिव रुपेश पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)🔶🔷
पेण नगरपालिकेने शहरातील सर्व रस्ते पावसाळ्याच्या पूर्वीच नव्याने तयार केले मात्र पावसाळा सुरू होताच शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून दुचाकीस्वारांचे अपघात होऊ शकते दोन दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट उभे आहे त्यामुळे सदर उत्सवावर जरी कोरोनाचे सावट पसरले असले तरी तालुक्यातील नागरीकांची पेण बाजारपेठ मध्ये खरेदी साठी ये-जा सूरू आहे परंतु पेण शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असुन काही वेळेस दुचाकीस्वारांचे अपघातही होत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन सदर खड्डे भरण्यात यावेत अन्यथा खड्डे महोत्सव कार्यक्रम करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.






Be First to Comment