Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक

गणेशोत्सव काळात कोरोनासंदर्भांत कालजी घेण्याची गरज : पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे 🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷

गणपती उत्सव कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर साधेपणात व शांततेत सण साजरा करुन शांतता कमिटीच्या सदस्यांनी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याच्या कर्तंव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत केले आहे.

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता समाजोपयोगी कामे करावीत तसेच कोरोनाचा रसायनी पाताळगंगा परीसरात संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी,विसर्जंन व आगमन मिरवणूक यांस मनाईं आहे,अन्नदान ,प्रसाद वाटप तसेच विसर्जंन घाटावर आरतीसाठी एकत्रित राहण्यावर मनाईं आहे. सार्वजनिक मंडळांनी पोलिस ठाण्याचा परवाना घेऊनच गणपती बसवावा. यासाठी मंडलांच्या अध्यक्षांनी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक आहे‌. सोसायटीमध्ये गावात, कृत्रिम हौंद आदीत गणपती विसर्जन करावे.यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे.तसेच लहान मुलांना व वृध्दांना विसर्जन घाटावर येण्यास मनाई आहे,असे आवाहन पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले असून आदेशाचा भंग करणा-यां विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा ही दिला आहे.

दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव निमित्ताने मोहोपाडा बाजारात गर्दी होणार असल्याने ग्रामपंचायतीने सोशल डिस्टिंक्शनचे तसेच मास्कचे पालन केले जाते का,याची तपासणी करावी.यात दुकानदार तसेच ग्राहक या दोघांचाही समावेश असून संबंधितांवर दोन वेळा दंडात्मक करुनही तिस-यांदा निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर पोलिस कारवाई करावी अशी आदेशवजा सुचनाही केली आहे.यावेली गणेशोत्सव कालात घ्यावयाची काळजी,विसर्जंन सुचना,विद्युत पुरवठा,रस्ते, आरोग्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

‌कोरोनाच्या संभाव्य संसर्गांला गणेशोत्सव साजरा करत असताना वाढ होवू नये यासाठी नागरिकांनी दक्षता घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा ‌तसेच रमझान ईद,बकरी ईद, आंबेडकर जयंती आदी सणात मुस्लिम बांधवांसह नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्याने त्यांचे पोलिस ठाण्याच्यावतीने आभार मानण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टींगशनचे तंतोतंत पालन करण्यात आले.यावेली रसायनी पाताळगंगा विभागातील शांतता कमिटी सदस्य,परीसरातील गणेश मंडल अध्यक्ष , ग्रामपंचायत पदाधिकारी आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .‌

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.