सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷
गणेशोत्सवाच्या तोंङावर व्यवसाय करणा-यानी अँन्टीजन चाचणी करण्याचे आदेश निघाल्याने खालापूरातून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी रायगङ यानी आदेश काढून व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते,दूध विक्रेते , पेट्रोल पंपावरिल कर्मचारी तसेच दैनंदिन व्यवसाय करणा-यानी अँन्टीजन तपासणी स्वखर्चाने करावी तसेच दुकानात काम करणा-या कर्मचा-यांची देखील तपासणी करावी अशी नोटीस काढली आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या वतीने टपरी धारक,हातगाङीवर धंदा करणारे तसेच दुकानदार याना तशी नोटीस देण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग गेल्या दोन महिन्यात प्रंचङ वाढला असून त्यावेळी शासनाने तपासणी करण्याचे टाळत गणेशोत्सव तोंङावर आला असताना चाचणी करण्यास सांगितल्याने व्यापारी नाराज आहे. लाॅकङाऊन शिथिल करताना शासनाने तपासणी करायला पाहिजे होती असे मत टपरीधारक संतोष साठे यानी व्यक्त केले.तर केवळ व्यवसाय करणारे कोरोना प्रसार करतील आणि ग्राहक कोरोना बाधित नसून सुरक्षित असेल अशी शासनाची समजूत चुकिचे असल्याचे मत व्यापारी व्यक्त करित आहेत.शासकिय कार्यालयात कर्मचा-यांची मोफत तपासणी आणि हातावर पोट असणा-याना स्वखर्चाने चाचणी बद्दल मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
आधीच लाॅकङाऊनमुळे आर्थिक घङी बिघङली आहे. त्या तपासणीचा खर्चाचा भार टाकला जात आहे. कमी खर्चात तपासणी होईल सांगण्यात येत असले तरी चौकशी केल्यानंतर प्रत्यक्षात खर्च जास्त आहे.
महेश लबडे
-फळ विक्रेता खालापूर






Be First to Comment