वीज वितरण कंपनीला निवेदन : तीव्र आंदोलनाचा इशारा #
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) :
कर्जत तालुक्यातील मधील नागरिकांना विज देयके भरमसाट आली आहेत याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने वीज वितरण कंपनीला निवेदन सादर करण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून पुढील तीन महिन्यांनी विज देयके माफ करावीत अशी मागणी निवेदनात केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
करोना विषाणूच्या महामारी संपूर्ण देशांमध्ये हाहाकार माजवला आहे या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने लॉक डाऊन आहे. या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये नागरिकांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशामध्ये सरकार विविध उपाय योजना राबवत आहेत मात्र वितरण कंपनी मनमानी कारभार करत आहे. या कालावधीमध्ये नागरिकांना भरमसाठ देयके पाठवून नागरिकांची लूट करत आहेत.

मार्च महिन्यापासून पुढील तीन महिने वीज वितरण कंपनीने नागरिकांना बिल माफ करावित असे निवेदनात नमूद केले आहे. असे न केल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल यास कंपनी जबाबदार राहील असे आज वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जगदीश ठाकरे, जिल्हा कार्यध्यक्ष श्रीकांत आगीवले, जिल्हा उपाध्यक्ष व सेक्रेटरी वैभव भगत, तालुकाध्यक्ष सज्जन गवळी, मराठा सेवा संघ सदस्य रामदास घरत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याची प्रत तालुक्याची तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आली आहे.






Be First to Comment