Press "Enter" to skip to content

स्वच्छता सर्व्हेक्षणात राज्यातून माथेरान नगरपरिषद अव्वलस्थानी !

माथेरान ठरला १० कोटी रुपयांचा मानकरी !

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान या दुर्गम भागातील ‘क’वर्ग दर्जा असलेल्या नगरपरिषदेने यावेळेस सन २०२० मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात संपूर्ण पश्चिम विभागातील एकूण पाच राज्यांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला असून महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.

माथेरान हे पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असून इथे सर्व प्रकारचे नियोजन हे मानवी शक्तीद्वारे करावे लागते.अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत इथे कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध नसताना प्रत्येक कामावर विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करून स्वच्छता बाबतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ओला आणि सुक्या कचऱ्याचे सुयोग्य पध्दतीने विलगिकरण त्याचप्रमाणे प्लास्टिक मुक्त माथेरान करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते आणि आजही ही संकल्पना कायम सुरू ठेवली आहे.

त्यातच स्वच्छता बाबतीत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासारखे उत्तम अधिकारी ठराविक काळापुरता इथे लाभले होते.त्यांनी येथील डंपिंग ग्राउंडचे उत्तरे प्रकारे नियोजन करून सर्वतोपरी सहकार्य केले होते. त्यांच्या कार्यकाळात गावातील गल्लीबोळात सुध्दा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट नियोजन पध्दतीने लावली होती.त्यास नागरिकांकडून तसेच दुकानदार, व्यापारी वर्ग यांच्याकडून सुध्दा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

कुठल्याही प्रकारची यांत्रिक साधनसामग्री नसताना माथेरान नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षणात पश्चिम पश्चिम विभागातील एकूण पाच राज्यांमध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला असून महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या सर्व टीमचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

नगरपरिषदेला प्राप्त झालेले हे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक सर्वांच्या सहकार्याने आणि विशेषतः कामगार वर्गाने घेतलेली मेहनत त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची अनमोल साथ आरोग्य विभागाचे अधिकारी अभिमन्यू येळवंडे, अन्सार महापुळे, कार्यालय अधीक्षक रणजीत कांबळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व समितीचे सभापती, नगराध्यक्षा, उप नगराध्यक्ष,आणि नागरिक ,व्यापारी वर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन आहे.

प्रसाद सावंत
-गटनेते माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.