अँड.कैलास मोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) :
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखले रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात त्यांना त्यांच्या गावात, विभागात कॅम्प लावुन घरपोच देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अँड.कैलास मोरे, यांच्या नेतृत्वात
कर्जत तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी अलिबाग-रायगड यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, 10 वी व 12 वीचे तसेच इतर शैक्षणिक वर्षांचे निकाल लागले आहेत. सदरचे निकाल लागल्यानंतर लाॅकडाऊन जरी सुरु असला तरी शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मा. प्रांत तसेच तहसीलदार कार्यालयाकडुन उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखल्यांची आवश्यकता भासते. कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही सुरु आहे. अशा परिस्थितीत प्रांत तसेच तहसीलदार कार्यालयात खुप गर्दी होत आहे आणि यामुळे कुठलेही शारीरिक अंतर ठेवले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
मागिल दोन वर्षापूर्वी कातकरी उत्थान अभियान सारखे कार्यक्रमातून असे ऊपक्रम जिल्हाभर राबवले गेले आहेत.त्याच अनुषंगाने कोरोना काळख़डात प्रशासन आपल्या दारी ,घरपोच कार्ड वाटप असे ऊपक्रम राबवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले त्यांना त्यांच्या गावात, किंवा विभागात आपल्या कार्यालयाकडुन कॅम्प लावुन घरपोच देण्यात यावे. जेणेकरून आपल्या कार्यालयात गर्दी होणार नाही तसेच कोरोनापासुन विद्यार्थ्यांचे संरक्षण होईल.तरी आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी अँड कैलास मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.






Be First to Comment