आदिवासी व ठाकूर समाज बांधवांना मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य किटचे वाटप ◆
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) :
अँटलस काप्को,दीपक फाऊंडेशन रोहा यांच्यावतीने रोहे तालुक्यातील एकूण १९ आदिवासीवाडी व ठाकूरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर समाज बांधव भगिनींना मोफत अन्नधान्य किटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचे नात्यातून अँटलस काप्को,दीपक फाऊंडेशन रोहा यांच्या वतीने नेहमी शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अँटलस काप्को व दीपक फाऊंडेशन रोहा यांच्या वतीने निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या समाथ बांधवांना एक मदतीचा हात म्हणून सदर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
प्रोजेक्ट काँर्डिनेटर अजय अवाडे,प्रिती जवरत,सीमा बारस्कर,ओजस्विनी महाडिक,मल्लैश हनचली,तळवली मा.उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर, सामाजिक कार्यकर्ते मधूकर पवार, सुरेश वाघमारे, हरिश्चंद्र पवार, मारूती बामणे,गुलाब वाघमारे, परशुराम बामणे आदींच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य किटचे वापर करण्यात आले.
या कार्यक्रम अंतर्गत दैनंदिन जीवनातील विविध अन्नधान्य साहित्य आदींचे वाटप आंबेवाडी, गोवे,संतोष, तळवली तर्फे अष्टमी, धानकान्हे,फोंडा, भुवनेश्वर, लांढर,शेणवई,भातसई,उसर,मुकटे,कारिवणे,शेडसई,मुचूने,केलाड,कविळटे,घोसाळे आदी १९ आदिवासीवाडी व ठाकूरवाडी येथील समाजबांधवांना करण्यात आले.
आज कोरोना व नैसर्गिक चक्रीवादळाने सा-यांचेच पुरते हाल केले आहेत. हाताला काम नसल्याने उपासमारीची वैळ येऊन ठेपली आहे.अशा कठिण काळात अँटलस काप्को कंपनी व दीपक फाऊण्डेशनच्या वतीने एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमातंर्गत केलेल्या सहकार्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत होताना दिसून येत आहे.






Be First to Comment