सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १६ जण सापडले आहेत. तर २३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १२११, उपचार करून बरे झालेले ९८०, उपचार घेणारे १७४, मयत ५७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज खोपटे १, नागाव २, नवापाडा करंजा १, मांगीर झोपडपट्टी भवरा १, पागोटे १, आवरे १, कामठा पंचवटी उरण १, मोठे भोम १, नवघर २, भेंडखळ २, केगाव १, कृष्णा पॅलेस उरण २ असे एकूण १६ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. करंजा १, नागाव ३, बोकडविरा २, मुळेखंड १, द्रोणागिरी १, केगाव ४, उरण ७, जेएनपीटी ३, दिघोडे १ असे एकूण २३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर खोपटे १ व नवघर १ असे २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोनाचा आकडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. तसेच मयताचा आकडाही दररोज वाढत असलेला दिसत आहे. त्यात दोन दिवसावर गणरायाचे आगमन होणार आहे. त्यावेळी हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने व आम जनतेनेही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.






Be First to Comment