मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यास होणार मदत #
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत :
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मुंबई ते मांडवा या सागरी मार्गावरील रो-रो सेवा गुरुवारपासून सुरू झाली आहे. या सेवेमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमधील चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे. त्याचबरोबर ब्रेक लागलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी रो रो सेवा उपयुक्त ठरणारी आहे.
सकाळी 9.15 वाजता व्यावसायिक तत्वावर प्रवाशांची पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून 206 प्रवाशी घेऊन मांडवा बंदरात पोहचली. हीच बोट सायंकाळी 4.00 वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करेल. हे वेळापत्रक 30 ऑगस्टपर्यत कायम राहणार आहे. कोरोनाच्या काळात या बोटीमध्ये शारीरिक अंतर व शासन नियम पाळणे शक्य होणार आहे. शिवाय सर्वसेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बोटीतून प्रवाशांना पर्यटनाचा देखील मनमुराद आनंद लुटता येणार आहे. प्रवाशांसाठी एम टू एम फेरी सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवरून बुकिंग सुरू असल्याची माहिती रो रो सर्व्हिसेस च्या माध्यमातून देण्यात आली.
तिकट दर
प्रवासी - 300 रु.
पाळीव प्राणी- 300 रु.
लहान कार-800 रु.
मध्यम आकाराची कार 1000 रु.
मोठे चारचाकी प्रवासी वाहन- 1200 रु.
दुचाकी -200 रु.
सायकल - 100 रु.






Be First to Comment