सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
कोरोनाच्या महामारी संकटात गर्दी होणार नाही असे व्यवसाय करण्यास बंदी असतानाही उरणमध्ये काही ठिकाणी जीम (व्यायामशाळा), खासगी ट्युशन तर काही बारमध्ये बसून खाण्या पिण्यास देत असल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे विचारणा केली असता कोणीही अधिकारी यावर काहीच उत्तर देत नाही. यामुळे नक्की काय सुरू आहे आणि कशावर बंदी आहे याची माहिती मिळत नाही.
राज्यावर कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून सर्वच ठप्प आहे. याला जवळ जवळ पाच ते सहा महिने झाले आहे. त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दी व जमाव जमल्यास होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशी व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद आहेत. त्यामध्ये शाळा, जीम(व्यायामशाळा), हॉटेल, मंदिरे, तसेच लग्नकार्य, मयतावर व इतर कार्यात उपस्थितीती ही ठराविक माणसं राहू शकतात असा सक्त आदेश आहे.
परंतु या आदेशाचे पालन होण्याऐवजी त्याचे उल्लंघन सर्रासपणे होत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
शाळा पूर्णपणे बंद असतानाही उरण परिसरात खासगी ट्युशन तसेच जीम(व्यायामामशाळा), तसेच काही बारमध्ये रात्री आतमध्ये बसून खाण्या पिण्याची सवलत दिली जात असल्याची चर्चा उरण परिसरात आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे याची विचारणा केली असता कोणीही अधिकारी वर्ग याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.
त्यामुळे वरील व्यवसाय करण्यास बंदी आहे की त्यांना परवानगी देण्यात आली याची माहिती मिळण्यास अडचण येत आहे. जर हे व्यवसाय करण्यास बंदी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा उरणकरांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्याची वेळ येईल. आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. त्यावेळी नियमांची पायमल्ली होण्याची शक्यता आहे. त्याचे विपरीत परिणाम
हे उरण तहसील कार्यालयातून कोरोना विषाणूचा दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अहवालात नेहमीच चढउतार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार हे स्पष्ट होत आहे.






Be First to Comment