कोरोनाबाबत काळजी न करता योग्य उपचार त्वरीत करा – पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) :
कोरोना या आजाराच्या भीतीने काहींचा आत्मविश्वास कमी होतो. कोरोना झाला म्हणजे आता आपले काही खरे नाही अशी मानसिकता अनेकांच्या मनात निर्माण होते. पण कोरोनाला घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. कोरोनातुन आपण पूर्णपणे बरे होतो. तरी काळजी न करता योग्य उपचार त्वरीत करा असे आवाहन शिवसेना पनवेल महानगरप्रमुखरामदास शेवाळे यांनी स्वानुभवातून केलेे आहे.
आपण सामाजीक वावर करीत असताना मलाही कोरोना संसर्ग झाला होता. मात्र उपचार घेऊन मी या आजारातून ठणठणीत बरा झालो आहे. कोणालाही दुर्दैवाने या आजाराची लागण झाली तर काळजी करण्याची आवश्यकता नाही.काही लक्षण आढळले की लगेचच दवाखान्यात जा अंगावर दुखणे काढु नका .उपचार घेतल्यानंतर आपण यातून नक्कीच बरे होऊन कोरोनावर मात करू शकता. आजार झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा तो होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. सामाजिक आंतर पाळण्यापासून, मास्क लावणे , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपण सर्वजण काळजी घेवून कोरोनावर नियंत्रणात ठेवाल असा आशावाद व्यक्त करतो.
आपल्या सर्वांचे आर्शिवाद व शुभेच्छा मुळे मी कोरोनाला हरवू शकलो.अशीच साथ या पुढेही मिळो हीच विनंती . कोरोनाला पुर्णपणे हद्दपार करण्याकरीता लवकरच लस येवो ही सुध्दा परमेश्वराकडे प्रार्थना. पण तत्पूर्वी आपण कोरोनाबाबत काळजी न करता हा आजार होवू नये म्हणून काळजी व खबरदारी घ्या हीच सदिच्छा व्यक्त करीत असल्याचे शिवसेना पनवेल महानगरप्रमुखरामदास शेवाळे यांनी सांगितले.






Be First to Comment