तपासावर समाधानी, आठ दिवसात चार्जशीट दाखल करावी : तांबडी प्रकरणावर आ.विनायक मेटेंचे भाष्य #
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) :
कोपर्डीनंतर तांबडीची घटना भयानक आहे. त्या निर्दयी घटनेचा निषेध करावे तेवढे कमी पडेल. त्यामुळे कोवळ्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविले जावे,अशी आमची प्रमुख मागणी आहे. घटनेच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत. पीडीत कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. आता आठ दिवसात चार्जशिट दाखल करावी. केस चालविण्यासाठी प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अप्रत्यक्ष होकार दिले आहे अशी विविध माहीती तांबडी प्रकरणावर आ.विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी बुधवारी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंब व ग्रामस्थांकडून घटनाक्रम समजावून घेतला. त्यानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भुमिका स्पष्ट केली.
यावेळी मनश्री माळगावकर, ऐश्वर्या राणे, सकल मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख,विजयराव मोरे,समीर शेडगे, शिवसंग्राम संघटनेचे अविनाश सावंत,अनंता देशमुख,सकल मराठा समाज रोहा कार्यकर्ते सूर्यकांत मोरे, सुहास येरुणकर,निलेश शिर्के,राजेश काफरे,व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री एक महिला आहेत. त्यांनी अधिक संवेदनशील हवे होते. तसे फार दिसले नाही असे आ. विनायक मेटे यांनी प्रारंभी सांगितले. अत्याचार व हत्या प्रकरणाची माहिती घेतली. त्यातून आरोपींना पकडण्यात आले आहे. त्याबाबत कुटुंबाशी चर्चा केली. त्यांना अधिक शंका नाहीत. त्यामुळे आता आरोपींवर चार्जशीट दाखल करून प्रकरण फास्ट ट्रॅक करावे,आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ह्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. जेवढी शक्य तेवढी सर्व कलमे लावलीत. तांबडी प्रकरणावर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.
तांबडी विभागातील लोक मोर्चा काढण्याच्या विचारात आहेत. त्यांना कोरोना व अन्य स्थिती समजावून सांगितली. त्यापेक्षा मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेउु असे ग्रामस्थांना सांगितले असे मेटे यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान आ. विनायक मेटे यांनी प्रकरणाच्या चौकशीवर समाधान व्यक्त केले. त्यामुळे आ. मेटे यांची भूमिका मराठा क्रांती मोर्चाला कितपत पटते ? हे पाहावे लागणार आहे.






Be First to Comment