स्वातंत्र काळातही ग्रामीण भागातील रस्ते पारतंत्र्यात : ग्रामीण भाग विकासापासून वंचित #
सिटी बेल लाइव्ह / गोवे -कोलाड (विश्वास निकम )
देशाला स्वातंत्र्य मिळवून तब्बल ७३ वर्ष पूर्ण झाली असून स्वातंत्र्याची वाटचाल ही शतकाकडे चालली आहे. परंतु काही ग्रामीण भागातील ग्रामस्त नागरिक हे स्वतंत्र काळात देखील पारतंत्र्यात मूलभूत सोयी सुविधा व विकासापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान देशाला डिजीटल इंडिया बनविण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत परंतु देशातील ग्रामीण भागात विकास नाही तर दिवसंदिवस भकास होत चाललेला दिसत आहे.

रोहा तालुक्यातील ग्रामीण भाग आज देखील काही काही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या रोहा तालुक्यातीलच रस्ते झालेत खड्डेमय तर ग्रामीण भाग देखील विकास कामांपासून वंचित राहिला आहे. ग्रामीण भागांसाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात परंतु काही आमलात काही अर्धवट तर काही कागदावरच राहतात. या गोष्टीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाबतीत उपस्थित केला जात आहे.
मुबंई गोवा महामार्गलगत असलेले खांब पालदाड मार्गाची गेली अनेक वर्षांपासून अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून अनेक आपघात या मार्गावर घडले आहेत. याची दुरुस्ती सोडाच परंतु खड्डे भरण्यास देखील प्रशासकीय यंत्रणेकडून टाळाटाळ केली जात आहे. अशी तक्रार संबधीत नागरिकांकडून केली जात आहे. तर या मार्गावरील ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच मार्गावर असलेल्या नाल्यांवरील साकव देखील जीर्ण झाले असून ते केव्हाही कोसळू शकतात. खांब देवकान्हे हा विभाग हा ग्रामीणभाग म्हणून ओळखला जात असून या भागात अद्याप काही मुबलक विकास कामांच्या सुविधा देखील नाहीत. काही गावागावात दोन दोन नळपाणी पुरवठा योजना असून बंद अवस्थेत आहेत.

विद्युत पुरवठा करण्याऱ्या विद्युत तारा व विद्युत खांब हे देखील पूर्णतः सडून गेले आहेत तर ते केव्हाही कोसळून संबधित रहवाशी व नागरिकांना मोठा धोका होऊ शकतो. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा संबधित महाराष्ट्र विद्युत महामंडळ वर्गाकडे हे खांब बदलण्याची मागणी केली मात्र त्या मागणीला देखील स्वातंत्र काळात केराची टोपली दाखवली जात आहे.
त्याचबरोबर रोहा शहराकडे येणारे सर्व मार्ग खड्डेमय झाले असून अक्षरशः चालन तर दोन दोन तीन तीन फूट मोठं मोठे खड्डे पडल्याने कोलाड रोहा मार्ग,मुरुड विरजोली रोहा मार्ग मुरुड सालाव चनेरा मार्गे रोहा अलिबाग सनेगाव रोहा नागिठाणे रोहा हे सर्व मार्ग खड्डेमय झाल्याने ऐन गणेशोत्सव काळात न भरल्याने मोठा आपघात होण्याचे संकेत मिळत आहे.
बोलबच्चन लोकनेत्यांकडून निवडणुकीत आश्वासन दिले जातात प्रत्यक्षात मात्र विकासाला टाळाटाळ.
कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की नेत्यांकडून गावागावातील नागरिकांना विकासाचे मोठे आमिष दाखवून दिले जातात. मात्र निवडून आले की पाठ फिरवतात आता पर्यंत किती खासदार किती आमदार निवडून आले. तर काही मंत्री देखील झाले. रायगडचे नाव देशाच्या राजधानीवर तर मंत्री मंडळात रायगड ला बहुमान मोठा आहे. तरी देखील रायगड रोहा ग्रामीण भाग हा विकासापासून वंचित आहे. या विभागातील राजकीय क्षेत्रातून जे मोठे कार्यकर्ते झाले ते गाव सोडून शहरी भागात स्थायीक झाले. निवडणुका आल्या की गावातील लोकांची आठवण येते. मात्र देश स्वातंत्र काळात देखील विकास कामांच्या ऐवजी खांब देवकान्हे मार्ग हा पूर्णतः भकास झाल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून या मागावरील तात्पुरताडागडुजी करावी अशी मागणी होत आहे.






Be First to Comment