रस्ता पाणी आणि शिक्षणाच्या प्रश्न लागणार मार्गी ! #
सिटी बेल लाइव्ह / (समीर बामगुडे – रोहा) :
आपल्यालाही विकासाच्या वाटा दिसतील या आशेने वस्तुस्थिती पाहायला आलेल्या अधिकाऱ्यांसमोर पारंपारिक नृत्य करून कोरलवाडीतील आदिवासींनी जल्लोष साजरा केला
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वाडीचा रस्ता पाणी आणि शिक्षणाचा कायमचा प्रश्न सुटणार या आनंदाने आदिवासींनी पारंपारिक नाच-गाणे करून प्रशासनाचे आभार मानले.

गेल्या काही महिन्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या वाडीतील ग्रामस्थांनी शासन दरबारी आपला प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला वाडीला मूलभूत सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि आदिवासिंचा तो हक्क आहे परंतु कोरळवाडीला जोडणा-या रस्त्याला वनविभागाची परवानगी मिळाल्याशिवाय हा रस्ता करता येणार नाही ही मोठी अडचण संतोष ठाकूर यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली यासाठी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून आदिवासी बांधवांचा सोबत उपविभागीय अधिकारी कार्यालय पनवेल यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते याची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रित बैठक घेऊन प्रत्यक्ष कोरळवाडी ला स्थळपाहणी भेट करण्याचे सर्व निर्देश दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी दिले होते त्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे मंगळवारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सौ शशिकला अहिरराव महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अधिकारी, पेन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गायकवाड , पनवेल सोनावणे वनपरिक्षेत्र अधिकारी ,सवनक्षेत्रपाल कांबळे पनवेल पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी लता मोहिते मॅडम आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कांबळे, बांधकाम विभागाचे अभियंता संदेश पाटील, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी साबळे, मंडळ अधिकारी मनीष जोशी, आपटा तलाठी कविता वाली,कर्नाळा तलाठी लाटे, जिल्हापरिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, पंचायत समिती सदस्य लनुजा टेंगे, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच भोईर,सदस्य वृषभ धुमाळ, स्वप्नील ग्राम संवर्धन संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड आणि कोरळवाडी आदिवासी वाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जमलेल्या सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या 21 ऑगस्ट पर्यंत आवश्यक असणारी कागदपत्र व दाखले प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर करणार असा विश्वास जमलेल्या करळवाडीच्या ग्रामस्थांना दिला त्यामुळे एवढ्या वर्षानंतर रस्ता पाणी आणि शिक्षणाचा प्रश्न सुटणार या आनंदाने कोरलवाडीच्या ग्रामस्थ नाच गाणे करून जल्लोष केला आणि आणि प्रशासनाचे आभार देखील मानले.






Be First to Comment