सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १५ जण सापडले आहेत. तर २१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर १ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह ११९५, उपचार करून बरे झालेले ९५७, उपचार घेणारे १८३, मयत ५५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज बापूशेठवाडी उरण १, सुरकीचापाडा करंजा १, खोपटा १, भेंडखळ ३, श्रीयोग करंजा १, सोनारी १, आवरे १, जेएनपीटी १, द्रोणागिरी १, नवापाडा करंजा १, नागाव २, मुळेखंड तेलीपाडा १ असे एकूण १५ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. चाणजे २, बोकडविरा १, धुतुम १, मोठी जुई १, उरण ५, मोरा १, करंजा ३, जेएनपीटी ५, जासई २ असे २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर चिरले येथील एका कोरोमाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह बरोबर मयताचा आकडाही वाढत चालल्याने उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.






Be First to Comment