सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई / राजेश बाष्टे #
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाज बांधवांच्या पाल्यांचा इ.१०वी महाराष्ट्र बोर्ड उच्च माध्यमिक चा निकाल नुकताच दि.२९जूलै रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये नवी मुंबई ,रायगड जिल्ह्यातील सुवर्णकार समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे:-
१) अँड. शाम रविंद्र शेठ विसपुते (पनवेल ) यांचा सपुत्र चि.आदित्य शाम विसपुते याने ८१.०% गुण प्राप्त केले.

२) श्री हेमकांत पुरुषोत्तम सोनार(अलिबाग) यांचा सपुत्र चि. सुमित हेमकांत सोनार याने ८५.२०%गुण प्राप्त केले.

३) श्री धनंजय भामरे (ऐरोली)यांनी सुकन्या कुमारी तनुश्री धनंजय भामरे हिने ९३.०%गुण प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांनी इ.१० वी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केले. या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, मेहनत, जिद्द तसेच आईवडिलांचा, गुरुजनांचा आशीर्वाद असून त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व समाजातील सर्व स्तरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे अध्यक्ष , कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष , अध्यक्षा,
सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णकार युवा मंडळ तसेच नवी मुंबई सुवर्णकार कार्यकारणी सदस्य आणि समाज बांधवांतर्फे (नवी मुंबई, पनवेल, रायगड जिल्हा इ.)शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
यश संपादन केलेल्या विद्यार्थी/विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नातेवाईक,मित्र आप्तेष्ट, गुरुजन वर्ग यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.






Be First to Comment