Press "Enter" to skip to content

‘या’ कंपनीला मिळाली IPL 2020 ची स्पॉन्सरशिप

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #

आयपीएल 2020 चे टायटल स्पॉन्सरशिप ड्रीम – 11 या कंपनीला 222 कोटींना मिळाले आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली.

चीनी कंपनी व्हिवो या वर्षीच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपवरून मागे हटल्यानंतर बीसीसीआय भारतातील स्पॉन्सर शोधत होते.

बीसीसीआयने व्हिवोची स्पॉन्सरशिप रद्द करत नवीन स्पॉन्सरशिपसाठी अर्ज मागवले होते.

आता मोबाईल फँटेंसी लीगसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इलेव्हनने अनेक कंपन्यांना मागे टाकत आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.

टाटा समूह, ड्रीम-11, पतंजली आणि बइजू अशा दिग्गज कंपन्यांनी यंदाच्या आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी बोली लावली होती.*

मात्र ड्रीम-11 ने सर्वाधिक बोली लावत यात बाजी मारली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.