सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवर) :
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची आॅॅॅक्सीमीटर व थर्मल स्क्रीनींग तपासणी करण्यासंदर्भात रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी १७ आॅॅगस्ट रोजी दिलेल्या आदेेेशाप्रमाणे राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कीरण पाटील यांनी त्वरित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्या संदर्भात रोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना व त्यासाठी नियुक्त केलेल्या अधिका-याांना सुचना केल्या आहेत.
त्यानुसारच रोहा पंचायत समिती मधील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व कोरोना विषाणू सर्वेक्षण पथक प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठण्याजवळील कोंडगाव (ता. रोहा) ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांची आॅॅॅक्सीमीटर व थर्मल स्क्रीनींग तपासणी मोहिम राबविण्यात आली.
कोडंगाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखील बाळाराम मढवी, माजी सरपंच अनंत वाघ, गोविंद हंबीर, मधुकर मढवी, निर्मला मढवी, सोनल वाघ, ग्रामसेवीका विद्या घरत व शिक्षक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेली ही आॅॅॅक्सीमीटर व थर्मल स्क्रीनींग तपासणी मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.






Be First to Comment