सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) येथील ज्येष्ठ नागरिक ह.भ.प तुकाराम विठू शिंदे (बुवा) यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांच्या कडसुरे येथील राहत्या घरी निधन झाले. कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे यांचे ते चुलत आजोबा होत.
धार्मिक कार्याची आवड असलेल्या कै. तुकारामबुवा शिंदे यांनी १९६२ साली तुळशी माळ घातली होती. त्यामुळे ते गावातील पाहिले माळकरी बुवा ठरले होते. त्यांनी कडसुरे गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय उभा केला होता. कै. तुकारामबुवा शिंदे यांचा कीर्तन, हरिपाठ, भजन आदि धार्मिक कार्यक्रमात नेहमीच सहभाग असायचा. त्यांनी गावात धार्मिक सलोखा ठेवण्याचे मोलाचे काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ह.भ.प ज्ञानदेव, ह.भ.प नामदेव, ह.भ.प अनिल ही तीन मुले, सूना, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. कै. तुकारामबुवा शिंदे यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी कडसुरे येथील गायनीवर व उत्तरकार्य गुरुवार २७ ऑगस्ट रोजी कडसुरे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती सरपंच राजेंद्र शिंदे यांनी दिली.






Be First to Comment