निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झालेले ४०% ग्रामीण भाग अद्याप मद्दतीपासुन वंचित
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
३ जून रोजी रायगडात भयानक झालेल्या निसर्ग चक्रवादळात अनेकांची घरे उध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले असून त्यांचे शासकीय तसेच स्थानिक पातळीवर पंचनामे केले.परंतु ग्रामीण भागातील काही नुकसानग्रस्त अद्याप अडीच महिन्यानंतरही मदती पासुन वंचित असल्याचे पहावयास मिळत आहे.
रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०% नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली आहे.परंतु निसर्ग चक्रवादळात प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील बहुतेक ४०% कुटूंब बाधितांना अडीच महिन्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नाही.या उलट विश्व हिंदू परिषद व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन पत्रे व कौले यांचे वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला आहे.परंतु शासनाच्या मार्फत पंचनामे करुनही मद्दत मिळाली नसून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पत्रे व्यवसायिकांनी यांच्या कडून जास्त पैसे उकलले जात होते.त्यांच्यावर देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला व नागरिकांना कामधंदा नसल्याने नागरिक हतबल झाले असतांना रायगडात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निसर्ग चक्री वादळाने रौद्ररुप धारण करून संपुर्ण रायगड सह रोहा तालुक्यातील कोलाड, खांब,देवकान्हे, सुतारवाडी,परिसरातील अनेकांचे संसार उदवस्त केले व कुटूंबच्या कुटूंब रस्त्यावर आले.
या वादळाने अनेकांची घरे,पत्रे यांची पडझड झाली तर काही घरेच जमीनदोस्त झाली तर काहींचे धान्य ही भिजवून नुकसान झाले या परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनानुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी स्थानिक आमदार खासदार सुनिल तटकरे,पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करून पंचनामे करण्यासाठी आदेश दिले होते.पंचनामे ही झाले मात्र प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झालेल्याना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.

निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा वाटप करण्यासाठी ५०कोटी निधी कमी पडत होता.परंतु ती ही रक्कम रक्कम मिळाली आहे.मग नुकसान मिळण्यासाठी उशीर का?असा सवाल नुकसानग्रस्त करीत आहेत. बहुतेक ग्रामीण भागात मोठया प्रमाणात नुकसान होऊन फक्त १५ हजार मिळाले आहेत. यामुळे अंदाजे दोन लाख रु. नुकसान झालेल्याचा खर्च भरून कसा निघेल ? अशा निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना अद्याप वाढीव रक्कम भरपाई मिळाली नाही असल्याची तकार समोर आली आहे.
यामध्ये पुई येथील मधील सदानंद साळूंखे यांचे संपूर्ण छप्पर उडाले असून घरातील टीव्ही,कडधान्य, भांडी व इतर सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले परंतु त्यांना फक्त १५ हजार रु.मिळाले आहेत त्यात लॉक डाऊनमुळे कोलाड तटकरे पार्क येथे सलूनचे दुकान पाच महिने बंद आहे. अशा लोकांनी करायचं काय ? यामध्ये काही कोलाड विभागातील रिक्षा व्यवसायिकांच्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.परंतु ते ही नाईलाजाने आपल्या घरावर तारपत्रि टाकून घरात राहत आहेत.व त्यांचा ही रिक्षा व्यवसाय लॉक डाऊनमुळे पाच महिन्यापासुन बंद आहे.यामुळे नुकसानपासुन वंचित राहिलेल्या ४०% नागरिकांना लवकरच लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधितांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावी अशी मागणी केली जात आहे.






Be First to Comment