सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #
उरण नगर परिषदेतर्फे शहरातील पथ विक्रेते उदाहरणार्थ टपरीवाले चहा हातगाडी,फळवाले,फुलवाल भाजीवाले,चर्मकार, चहावाले, चप्पलवाले अशा अनेक पथ विक्रेत्यांना कोरोनाच्या लोकडाउन मुळे आपले व्यवसाय बंद असल्याने आर्थिक फटका बसला. ही परिस्थिती निर्माण झाल्याने उरण नगर परिषदेने त्यांना पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधीयोजने मार्फत रुपये १० हजार कर्ज आर्थिक लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या कर्जाची परत फेड एका वर्षात करावयाची आहे या योजनेचा लाभ ज्या पथ विक्रेत्यांना घेण्यावयाअसल्यास पुढील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करावी.
१)मोबाईल लिंक असलेले आधार कार्ड,
२)लिंक असलेला मोबाईल नंबर,
३)स्टॉल धारक परवाना /भाडे करार
४) रेशन कार्ड
५)राष्ट्रीय बँक पासबुक,
६)ओळखी च्या दोन व्यक्तींची नावे,
७)अपंग असल्याचा दाखला,
८)मतदान ओळखपत्र,
या योजनेचा लाभ ज्या लाभार्थीना घेणे असल्यास पुढील कागद पत्रे उरण नगर परिषद कार्यालया सादर करावी अशी माहिती उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष माळी,नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उप नगराध्यक्ष जेवींद्र कोळी,गटनेते रवि भोईर जाहीर फलका द्वारे जाहीर केली आहे.






Be First to Comment