सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
आपल्या विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना वृक्ष संरक्षण व संवर्धनाचे महत्व कळावे व जंगल संरक्षण होऊन वनक्षेत्रात व मालकी क्षेत्रात वृक्षाचे संरक्षण करावे या उद्देशाने नागोठण्याजवळील ऐनघर येथील
श्रीमती गीता द. तटकरे विदयालयाच्या प्रांगणात देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षरोपवणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या वृक्षरोपवनाच्या कार्यक्रमाला श्रीमती गीता द. तटकरे विदयालयाचे मुख्याध्यापक अनिल वाघ, कानसई वनक्षेत्र परिमंडळ मधील वनाधिकारी सुहास रणवरे, कानसई वनक्षेत्र परिमंडळ वनरक्षक रविंद्र शिंदे, कान्हा सांबरी, एकनाथ धुळे, गौरी तोरवे, गणेश सुपे, वनरक्षक सतिशकुमार बागडे व ग्रामस्थांनी उपस्थित राहून वृक्षरोपवणाचा कार्यक्रम आनंदाने साजरा केला. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तटकरेे विद्ययालयाचे शिक्षक वर्ग व स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य मिळाले.






Be First to Comment