एकूण बाधितांची संख्या 97 वर : पालीत सर्वाधिक 20 रुग्ण #
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) :
सुधागड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि.18) तालुक्यात 5 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रुग्णांचे आकडे वाढत आहेत. पालीत सर्वाधिक 20 रुग्ण असल्याने पालिकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालीकर धास्तावले आहेत.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल 97 रुग्ण झाले आहे. आणि आत्तापर्यंत कोरोनाचे 68 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 27 रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियम व अटींचे पालन करून खबरदारी घ्यावी, प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.






Be First to Comment