सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) :
उरण पूर्व विभागातील मौजे आवरे येथील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक नेते शा ल गावंड गुरुजी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
स्वर्गीय शांताराम लक्ष्मण गावंड .( शां. ल. गावंड गुरुजी )यांना अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली आणि आवरे गावाचे द्रोणाचार्य हरपले…अष्टपैलू व्यक्तीमत्व, कबड्डीपट्टू,.. चित्रकार,..सुंदर हस्ताक्षराचा नजारा….पहाडी आवाजाचे वक्ते. . शिकविण्याची एक वेगळीच शैली… विद्यार्थी प्रिय..समाजप्रिय… सर्वगुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्व असणारे… आवरे गावात शेकडो आदर्श व गुणवंत विद्यार्थी घडविणारे गुरुजी म्हणून शा. ल. गावंड गुरुजी यांचे आदराने नाव घेतात.. केवळ शैक्षणिक कार्यच नाही तर सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचे योगदान मोलाचे आहे.
आवरे गावाचे भोलेनाथ मंदिर जीर्णोद्धारात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. आवरे गाव व पंचक्रोशीत अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शिक्षकनेते शा ल गावंड गुरुजी हे माजी आमदार विवेकानंद पाटील ,आमदार पंडितशेट पाटील, तसेच जि प चे माजी अध्यक्ष कै प्र ना पाटील यांचे अतिशय जवळीक होते. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक समारंभात हिर हिरीने सहभागी होणारे शिक्षक नेते सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती शिक्षकांच्या समस्या मांडणारे एकमेव नेते शा ल गावंड गुरूजी यांनी अनेकांची अश्रू पुसले आहेत.
गोर गरिबांना मदतीचा हात देणारे तसेच महाY मुंबई s e z आंदोलनात सक्रिय सहभाग दहा गाव माझी विध्यार्थी सदस्य एवढेच नाही तर गावात कोणाचही मयत होवो त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे काम त्यांच्याच वक्तव्या ने व्हायचे अशी समाजप्रिय व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याने परिसरात शोक कला पसरली आहे.
त्यांच्या दशक्रिया विधी मंगळवार दि 25/08/2020 रोजी श्री क्षेत्र हरी हरेश्वर श्रीवर्धन येथे होणार असून उत्तर कार्य गुरुवार दि 27/08/2020 रोजी आवरे येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे






Be First to Comment