रायगड भूषण कवी प्रा. एल. बी. पाटील सांगणार आगरी भाषेचे महत्व #
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) :
“कोंकणी राष्ट्र मान्यता दीस ” म्हणजेच कोंकणी राष्ट्र मान्यता दिवस गुरुवारी (दि.20) रोजी आहे. या निमित्त दुपारी 3.00 वाजता ‘कोंकणी विविध बोली’ हे ऑनलाइन कवी संमेलन होणार आहे. या संमेलनात आगरी बोलीला स्थान देण्यात आले आहे. या संमेलनात आगरी भाषेला सन्मान मिळाला असून रायगड भूषण कवी प्रा. एल. बी. पाटील आगरी भाषेचे महत्व सांगणार आहेत.
फेसबूक व युटुबवर होणाऱ्या या अनोख्या कवी संमेलनाचे आयोजन डॉ. भूषण भावे, योगिता वेर्णेकर, मनोज कामत यांनी केले आहे.
शशिकांत पुनाजी (गोवा), बदरुनी क्वादूस (मुंबई) स्मिता शेन्नाय (मंगळूर) नितीन गोन्सल्वीस (बेळगाव)
रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील (उरण), सुनिल नायक (कारवार), रुजरिवो पिंटो (मालवण), चंद्रिका वालावकर (गोवा), चिदानंद भंडारी (कुमथा) देवीदास गावकर (कानकोंन), रुपाली कीरतने (मुंबई), विल्यम कतिल (मंगळूर), किसन कुमार (केरळ), सुशीला भट (कोचिन) सैगुला (ब्रम्हावर) हे ज्येष्ठ कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.






Be First to Comment