Press "Enter" to skip to content

प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या मागणीला यश !

कोरोना बाधित असलेली बिल्डींग किंवा विंग सिल न करता फक्त मजला होणार प्रतिबंधित

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

कोव्हिड १९ बाधित रूग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत क्वारंटाईन वा प्रवेश बंद न करता फक्त संबधित सदनिका अथवा मजला क्वारंटाईन करण्यात यावी अशी मागणी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला मजला फक्त प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे महानगरपालीकेने जाहीर केले आहे.

संजय भोपी यांनी मागणी केलेल्या निवेदनाची प्रत

यापुर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोव्हिड १९ वाधित रूग्ण आढळल्यास संबधित रूग्ण रहात असलेली संपूर्ण इमारतच निर्वधित केली जात असे. या इमारतीतील इतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्याही हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून सर्वांवरच निबंध लादले जात असत. होम क्वारंटाईनचा कालावधी हा १४ दिवसांचा असून त्यानंतर दोन-चार दिवसांनी जर त्याच इमारतीमध्ये दुसरा एखादा रूग्ण आढळल्यास पुन्हा १४ दिवस क्वारंटाईन होणे असे चक्र चालू होते. या परिस्थितीमुळे नागरीकांना अनेक दिवस क्वारंटाईन रहावे लागत होते. त्याचा त्यांच्या जीवमानावर विपरीत परीणाम होताना दिसत होता. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना या सक्तीच्या क्वारंटाईनमुळे नागरीकांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीही घराबाहेर पडण्यास निबंध लादले जात असत.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असंख्य बहुमजली इमारती असून सदर इमारतींमध्ये ५० ते ६० पेक्षाही जास्त तर सोसायटींमध्ये १५0 ते २00 पेक्षाही जास्त कुटुंबे वास्तव्यास आहेत. महानगरपालिकेकडून एखादी इमारत अथवा सोसायटी क्वारंटाईन केली गेली तर याचा नाहकचा त्रास या कुटुंबातील शेकडो रहिवाश्यांना सहन करावा लागत असल्याने संबंधित स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

म्हणूनचं कोव्हिड १९ बाधित रूग्ण आढळल्यास संबधित रूग्ण रहात असलेली सदनिका अथवा फक्त सदरचा मजला क्वारंटाईन करण्यात यावा अशी मागणी संजय भोपी यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने असंख्य पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेने काढलेले सुधारीत परीपञक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.