Press "Enter" to skip to content

कोरोनाने जुन्या दिवसांची आठवण करून दिली

कोरोनाने माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं ! गाव खेड्यापाड्यातील वृद्ध, जुन्या ज्येष्ठांचे बोल #

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) :

गरिबी आली तर लाजू नये , आणि श्रीमंती आली तर माजू नये हे म्हण वाडवडिलांपासून प्रचलित आहे. 21 व्या शतकाने संगणक युगात पाऊल ठेवले. प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घालणारी नेत्रदीपक प्रगती साधली, मात्र कोरोना सारख्या आंतरराष्ट्रीय साथ रोग आला आणि जगाची झोप उडवून दिली.

कोरोनाने पाच आठ दशकापूर्वीच्या जुन्या व गरिबीतल्या त्या दिवसांची आठवण करून दिली, कोरोनाने माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं असे गाव खेड्यापाड्यातील वृद्ध, जुने, ज्येष्ठ आता बोलू लागले आहेत. कोरोनाने राज्य व देशाचं अर्थचक्र मंदावले. टाळेबंदीमुळे आलेली आर्थिक मंदी, नोकऱ्यांवर कुऱ्हाड, वेतनात झालेली कपात, शैक्षणिक अडथळे, बाजारपेठेत मंदीचे सावट, उद्योग व्यवसाय ठप्प, अनिश्चित भवितव्य यासारख्या गोष्टींचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे सारं काही जागच्या जागी थांबल.

अशावेळी समाजातील विविध सामाजिक संस्था संघटना व वैयक्तिक रित्या मदतीचे हात पुढे आले. लोकं एकमेकांचे सुख दुःख जाणू लागले.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन चा पर्याय अवलंबिला. याने दळणवळण व  वाहतूकीची साधने ठप्प झाली. शहरी भागातील लोक शहरात , तर गाव खेड्यापाड्यातील लोक जागीच अडकून पडले. त्यामुळे जो ज्या परिस्थितीत आहे त्याच परिस्तिती तो जगू लागला. त्यातूनही अनेकांनी शहरातून आपल्या गावी येऊन राहणे पसंत केले.

कोरोनाच्या काळात  माणूस कोणत्याही वाहनांवर अवलंबून न राहता पूर्वीसारखा कोसो दूर पायी चालत जाऊ लागला.  कोरोनामुळे स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि किती बारीक-सारीक सवयींद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो, हे शिकवलं. 

आपली माणसं, कुटुंब, खेडयातील जीवन किती सुंदर असतं, हे सर्व कोरोनानं शिकवलं. कोरोनाने निसर्गाचा आदर करायला शिकवलं. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. कष्टकरी, श्रमजीवी, हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला. अशावेळी माणुसकी व मानवतावादी दृष्टिकोन जपत एकजण दुसऱ्याच्या मदतीला धावून आला.भौतिक आणि चंगळवादी सुख निसर्गापुढे खूप क्षुल्लक आहेत.  कुटुंबासोबतचा रोजचा संवाद हा कोणत्याही सुखाच्या व्याख्येत बसवता नाही येणार. कोरोनाने गरीब श्रीमंत हे भेद संपवले, व आपण सारे मनुष्य आहोत हे मनी बिंबवलं. सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोन कोरोना काळात शिकायला मिळाला.

कोरोनाने माणसाला जगायला शिकवले, कोरोना काळात प्रत्येकजण स्वतःची, कुटुंबाची काळजी घेऊ लागला. आपापल्या कुटुंबात रमू लागला, स्नेह व आपुलकीने वागू लागला. ताण तणाव कमी झाल्याने सुखी व समृद्ध झाला. याकाळात घरगुती व आयुर्वेदिक उपचारावर भर दिला जाऊ लागला.

गावठी भाज्या, फळे, जीवनसत्त्व युक्त पोषक आहार घेतला जाऊ लागला. मधल्या काळात उद्योग, कारखाने बंद ठेवण्यात आले होते. यावेळी जल, वायू, ध्वनी प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले. हवा शुद्ध झाली, व निसर्ग पर्यावरणात पशु पक्षी प्राण्यांचा किलबिलाट व  मुक्त संचार  पूर्वीसारखा दिसू लागल्याने ज्येष्ठ व पर्यावरणप्रेमींनी  समाधान व्यक्त केले.

कोरोनाच्या महामारीत गोरगरीब गरजवंतांना जीवनावश्यक साहित्य व अन्नधान्य पाकिटे  देऊन माणुसकीचे दर्शन घडविताना सामाजिक कार्यकर्ते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.