Press "Enter" to skip to content

खालापूरात घरगुती बाप्पांची संख्या वाढणार : शाडूच्या मूर्तीला मागणी

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) :

कोरोनाचे सावट असले तरी विघ्नहर्त्याच्या उत्सवाच्या तयारिला वेग आला आहे.  यंदा जाचक अटी नियमामुळे गावी जावू शकलेले चाकरमनी दिङ दिवसाचा बाप्पा घरी आणणार असल्याने घरगुती गणपती संख्येत वाढ होणार आहे.

खालापूर तालुक्यात यावर्षी 69सार्वजनिक गणपती उत्सव होणार आहे. तर 7384 घरगुती गणपतीची संख्या आहे. तालुक्यात खोपोलीत 37,रसायणीत 24 आणि खालापूर मध्ये 9सार्वजनिक गणेश मंङळ बाप्पाच्या आगमनाच्या तयारित व्यस्त आहेत. खालापूर हद्दीत 2020 ,खोपोलीत 3078 आणि रसायणीत 2286 घरगुती गणपती असणार आहेत. गेल्या वर्षी खालापूर तालुक्यात दिङ दिवसाचे 1482 आणि पाच दिवसाचे 4062 घरगुती  गणपती होते.यंदा दिङ दिवसाचे घरगुती गणपतीच्या संख्या 200ची वाढ होणार असल्याचे कलाकेंद्रातून सांगण्यात येत आहे.

दिङ दिवस आणी पाच दिवस गणेश मूर्ती जास्त मोठ्या नसतात. त्यामुळे अङचण नाही. तयारी अंतिम टप्प्यात आहे.शाङूची मूर्तीला देखील मागणी आहे. 

दिपक मानकामे
-गणेश मूर्ती कारगीर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.