बेग कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रसामुग्री कॉन्ट्रॅक्टरांच्या ताब्यात : 19 ऑगस्टची दिली अंतिम मुदत #
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) :
पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदी करणाचे काम बेग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनी कडे होते. या कामी सदर कंपनीसोबत अनेक ग्रामस्त, स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जोडले होते. सदर कामाकरिता स्थानिक लेबर ठेकेदार, सब कॉन्ट्रॅक्टर, मशनरी इत्यादी कामाचे बाकी असलेले पैसे न दिल्या कारणाने स्थानिक ठेकेदार आक्रमक झाले. थकबाकी मिळेपर्यंत पर्याय म्हणून मशनरी कॉन्ट्रॅक्टर च्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी कॉन्टॅक्टर यांनी केली, त्यानुसार बेग कन्स्ट्रक्शनने सकारात्मक प्रतिसाद देत लेखी स्वाक्षरी पत्र देऊन सदरची थकबाकी देईपर्यंत मशनरी व यंत्रसामुग्री कॉन्ट्रॅक्टर कडे सोपवून त्याच्या देखरेखीकरता सुरक्षा रक्षक देण्याचे मान्य केले. या सामुग्रीत लोडर, रोलर, एक्सकेवेटर सैनी, डंपर, बोलेरो, मोटर सायकल, 2 बुलेरो कँपर्स, आर एमसी प्लॅन्ट, बी टू मेन पेवर, पिक्युसी मॅन्युवल पेवर, आर एमसी काँक्रीट पंप आदींचा समावेश आहे. सदर कंपनीला कॉन्ट्रॅक्टर यांनी दि.19 ऑगस्ट 2020 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. पाली खोपोली राज्य महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. मार्गाच्या कामाला वेग यावा याकरिता मोनिका कन्स्ट्रक्शन कडून खांदे पालट करीत बेग कन्स्ट्रक्शन कडे काम सोपविण्यात आले. यावेळी स्थानिक ठेकेदारांना सोबत घेऊन कामाला सुरुवात झाली. आजघडीला बेग कन्स्ट्रक्शन नवीन कॉन्ट्रॅक्टर सोबत घेऊन काम करीत असून स्थानिक कॉन्ट्रॅक्टर ची थकबाकी अजून आम्हाला मिळालेली नाही, असे कॉन्ट्रॅक्टर मनीष खवळे यांनी सांगितले. आम्ही सातत्याने प्रशासनाला देखील याबाबत माहिती दिली, बेग कन्स्ट्रक्शन कडून वेळ काढू पणाची भूमिका घेतली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे आमच्या कामाची बिले मिळेपर्यंत कंपनीची यंत्रसामग्री कॉन्ट्रॅक्टर यांच्या ताब्यात ठेवण्याचे ठरले आहे.असे कॉन्ट्रॅक्टर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर निर्णय व प्रक्रिया बैठक पोलीस बंदोबस्ताखाली पार पडली. यावेळी सबंधीत कॉन्ट्रॅक्टर मनीष खवळे, संजय शिर्के, नितीन वाघमारे, अर्षद खान, अतिष खंडागळे, संदीप उमटे, अमित गायकवाड,राजू बडेकर, तसेच बेग कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने अधिकारी सुजय पॉल, तकयुर इकबाल व अन्य अधिकारी उपस्थित होते.







Be First to Comment