माणगांव प्रशासकीय भवनात खासदार सुनिल तटकरेंनी घेतली पत्रकार परीषद #
सिटी बेल लाइव्ह / समिर बामुगडे / माणगाव #
माणगांव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात रायगड लाेकसभा 32 चे खासदार सुनिल तटकरे यांनी निसर्गचक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला. यावेळी माणगांव तालुक्यातील बहुतांशी पत्रकार व माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव,तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे नायब तहसिलदार भाबड,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे,माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी,व विविध प्रशासकीय अधिकारी,उपस्थित हाेते.
यावेळी तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना सुमारे 97% नुकसानभरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे असे अवाहन खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे.
साेबत नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील नुकसानग्रस्तांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.






Be First to Comment