कामगारांचे कोव्हीड १९ ची चाचणी अँटिजेन – आरटीपीसीआर टेस्ट करा #
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
उरण जेएनपीटी कंपनीतील अधिकारी व कामगारांची कोव्हीड १९ ची अँटिजेन – आरटीपीसीआर तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जेएनपीटीला केले आहे.
रायगड जिल्ह्यात कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जेएनपीटी कंपनीत काम करणारे अधिकारी, कामगार हे मुंबई, पुणे व ठाणे या सारख्या कोव्हीड १९ विषाणूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागातून ये जा करीत आहेत. यामुळे कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या अधिकारी व कामगार यांची कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव तपासणीसाठी अँटिजेन – आरटीपीसीआर तपासणी करण्याची आवश्यकता आहे. तरी जेएनपीटी कंपनीत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कामगारांची कोव्हीड १९ अँटिजेन – आरटीपीसीआर तपासणी टप्याटप्प्याने करून आपले स्तरावर कार्यवाही करून सदर चाचणीचा अहवाल आयसीएमआर पोर्टल वर अपलोड करून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयालाही अवगत करण्यात यावे असे ही आवाहन करण्यात आले आहे.






Be First to Comment