Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा कहर,आज नव्याने 10 रूग्ण, एकूण 87

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे ###

कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वंत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनीत परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भिती निर्माण केली आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढून गुरुवारी नव्या दहा जणांचे कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले असून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 87 जण कोरोनाने बाधित झाले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत आली आंबिवली एक पस्तीस वर्षींय पुरुष,प्रिआ स्कुल मोहोपाडाजवल एक पुरुष, नविन पोसरी एक पंचाअत्तर वर्षीय महिला, शिवनगर एक छत्तीस वर्षीय पुरुष,चांभार्ली एक सत्तर वर्षींय महिला,रिस वैष्णोनगरी वसाहत एक पुरुष,रिस नविन वसाहत दोन पुरुष एक महिला,रिस नविन वसाहत चालीस वर्षीय पुरुष असे दहा कोरोनाबाधित सापडले असून याअगोदर उपचारानंतर बावीस जण बरे झाले आहेत.तर लोधिवली गाव एक पुरुष,चौक एक,वानिवली तीन आहेत.
नागरिकांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आपल्या स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.रसायनीकरांनो आतातरी सावध व्हा! विनाकारण घराबाहेर पडणे टाला,सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करा असे आवाहन पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.