Press "Enter" to skip to content

उरण शहरातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारी सोबत परिसराचे नाव जाहीर करा


उरण शहरातील नागरीकांची उरण तहसीलदारांकडे मागणी ###


सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी ###

उरण शहरात कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याची आकडेवारी दररोज वृत्तपत्र, सोशल मिडियावर ही माहीती उरण तहसिलदार कार्यालयातून प्रसिद्धीसाठी दिली जाते. ही बातमी प्रसिध्द होताना मात्र या बातमीत फक्त उरण शहर रूग्ण ४ असा उल्लेख असतो परंतु हे रूग्ण उरण शहरातील ज्या परिसरातील आहेत त्या परिसरातील उल्लेख नसल्यामुळे कोणत्या परिसरात हे रूग्ण सापडले ही माहिती उरण शहरातील नागरीकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने माहीत असावे अशी मागणी नागरिकांची आहे. कारण जर हे रूग्ण कोणत्या परिसरातील आहेत याची माहिती नागरिकांना समजली नाही तर नागरीक सावधगिरी कसे बाळगतील असा सवाल नागरीकांनी उपस्थित केला. या पुढे ही माहिती देताना उरण तहसिलदारांनी उरण शहरात जे रूग्ण सापडतील ते रूग्ण रहात असलेला परिसराचा उल्लेख माहिती देताना आवर्जून करावा अशी मागणी उरण शहरातील जनतेने केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.