सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ###
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दरवर्षी सुतारवाडी येथे भरगच्च कार्यक्रमांनी होणारा आपला वाढदिवस यावर्षी साजरा न करण्याचे ठरविले आहे.
मात्र असे असले तरी खासदार सुनील तटकरे यांचा ६५ वा वाढदिवस उद्या शुक्रवार दि. १० जुलै रोजी राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात सर्वत्र विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या वाढदिवसानिमित्त नागोठणे विभाग युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनेही नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांसाठी हँड सँनिटायजर, मास्क, फेस शिल्ड, हँड ग्लोज व इतर उपयोगी वस्तुंचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्वादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे यांनी दिली.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ११ वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे शहर व नागोठणे विभागातील सर्व जेष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन युवक राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग यांनी केले आहे.
Be First to Comment