जाणुण घ्या काय आहेत या पनीर चे फायदे !
सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट #
पनीर प्रत्येक घरात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून पनीर बनविले जाते.
आपला आहार दुधाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दुधामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त सारख्या अनेक पोषक तत्त्वे आढळतात. परंतु युरोपमधील सर्बिया देशात दुसऱ्याच प्राण्याचे दूध पनीर तयार करण्यासाठी वापरले जाते.
खास गोष्ट म्हणजे त्यातून बनविलेले पनीर बाजारात सर्वात महाग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे पनीर 78000 रुपये किलो रुपयांप्रमाणे विकते.
युरोपियन देश सर्बियामधील फार्महाऊसमध्ये जगातील सर्वात महाग पनीर बनविले जाते.
हे गाढवाच्या विशेष जातीच्या मादीच्या दुधापासून बनविलेले आहे.
* किंमत आहे ७८ हजार प्रतिकिलो: – पनीर हे दुधापासून बनविलेले एक अतिशय महत्वाचे उत्पादन आहे.
सामान्य पनीर बद्दल चर्चा केली तर भारतात ते तुम्हाला प्रति किलो 300 ते 600 रुपयांपर्यंत मिळते, पण जर तुम्ही या गाढविणीच्या दुधाच्या पनीरबद्दल बोलाल तर ते प्रति किलो 78 हजार रुपये विकले जाते.
* कुठे बनवतात ‘हे’ पनीर :-युरोपियन देश सर्बियातील एका फार्म हाऊसमध्ये गाढविणीच्या दुधापासून पनीर तयार केले जाते. हा फार्म जैसाविका म्हणून ओळखला जातो. या शेतावर 200 हून अधिक गाढवे ठेवण्यात आली आहेत.
भारतातील जर्सी गायींमध्ये दिवसाला 30 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे, परंतु गाढवातून 1 लिटर दूध मिळविणे अवघड आहे. हेच कारण आहे की या शेतातल्या सर्व गाढविनिंच्या मिळणाऱ्या दुधातून फक्त 15 किलो पनीर तयार करता येतो.
असे महाग पनीर सर्व गाढवांच्या दुधापासून तयार करता येत नाही. फक्त बाल्कन प्रजातीची गाढवे असलेल्यांचे दूध सर्वात पौष्टिक मानले जाते. या प्रजातीची गाढवे बहुधा सर्बिया आणि मॉन्टेनेग्रोमध्ये आढळतात.
* या आजारांसाठी गुणकारी :- सर्बियाचे पनीर उत्पादक सांगतात की, गाढव आणि आईच्या दुधात समान गुणधर्म असतात. त्यात पुष्कळ पौष्टिक घटक आढळतात. ते दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांनी सेवन केल्यास त्यांना मोठा फायदा होतो.
त्याच वेळी, बर्याच लोकांना गायीच्या दुधापासून ऍलर्जी होते. २०१२ मध्ये सर्बिया टेनिस स्टार नोवाक जोकोविच बद्दल सांगण्यात आले की तो या पनीरचे सेवन करतो. परंतु नंतर जोकोविचने अशा बातम्यांचे खंडन केले होते.






Be First to Comment