संपूर्ण स्वदेशी बनावटीचे विमान होणार देश सेवेसाठी रूजू
सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #
भारताला अभिमान वाटेल अशी गोष्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. कॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या विमानाचं टेक ऑफ लँडिंगची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता आणखी दोन चाचण्या बाकी आहेत. अमोल यादव यांनी स्वतः यासंदर्भातली माहिती दिली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावाटीच्या आणखी दोन चाचण्या बाकी आहेत. त्याच्या झाल्या की हे विमान सेवेत रुजू होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमोल यादव यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवर या विमानाची निर्मिती केली. २०१६ मध्ये मेक इन इंडियाच्या प्रदर्शनात हे विमान ठेवण्यात आलं होतं.
विमान तयार झाल्यानंतर डीजीसीएच्या संमतीसाठी लागलेला वेळ आणि या प्रक्रियेनंतर विमानाला विमानाला विमा संरक्षण मिळाल्यानंतर कॅप्टन अमोल यादव यांनी विमानाची यशस्वी चाचणी केली. विमानाची टेक ऑफ आणि लँडिंग चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढची चाचणी ही पूर्ण सर्किटची असेल. त्यानंतर एका विमानतळावरुन दुसऱ्या विमानतळावर अशी दुसरी अशी चाचणी असेल असंही यादव यांनी सांगितलं.
कॅप्टन अमोल यादव यांनी चारकोप येथील त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर या विमानाची निर्मिती केली. तर वांद्रे इथल्या मेक इन इंडियाच्या प्रदर्शनातही हे विमान ठेवण्यात आलं होतं. सहा आसनी क्षमता असलेलं हे विमान आहे. भारतात तयार करण्यात आलेलं हे पहिल कमर्शियल एअरक्राफ्ट आहे.






Be First to Comment