Press "Enter" to skip to content

जाणुण घ्या पंतप्रधान मोदींच्या या नव्या विमानाची खासीयत

सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली # 

भारतात लवकरच एअर इंडिया वन बोइंग 777-300ERs विमान दाखल होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एअर इंडिया वन विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसह अनेक VVIP मंडळींना या विमातून उड्डाण भरता येणार आहे. आता एअर इंडिया वन हे विमान कधी भारतात दाखल होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या विमानामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. विमानातील केबिनला एक नवं रूप देण्यात आलं आहे. ज्यामध्ये लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काउंटरमेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ-प्रोटेक्शन स्वीट (एसपीएस) समाविष्ट आहेत.

शिवाय जमीनीपासून आकाशात दूर अंतरावर गेल्यानंतर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट देखील असणार आहे. एअर इंडियाच्या 40 वैमानिकांच्या पथकाला भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांसह अत्याधुनिक व्हीव्हीआयपी विमान उड्डाण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

यापूर्वी भारतातील व्हीव्हीआयपी 747 बोइंग जेटमधून प्रवास करत होते. व्हीव्हीआयपी मंडळींना उड्डाण करण्यासाठी अत्याधुनिक विमान निर्मितीची प्रक्रिया बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. 747 बोइंग विमान लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य नाही.

इंधन भरल्यानंतर हे विमान १० तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण भरू शकतो. तर एअर इंडिया वन हे विमान सलग १७ तास उड्डाण भरू शकतो. एअर इंडिया वन मध्ये एक लॅब, जेवणाची खोली, मोठे कार्यालय आणि कॉन्फरन्स रूम आहे. एवढेच नव्हे तर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठीही विमानात मेडिकल सुट उपलब्ध करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.